आगार व्यवस्थापकाच्या चुकीच्या निर्णयाचा एसटीला फटका; शिवशाही बस जळून खाक

अमरावती : अकोल्यावरून नागपूरला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला बडनेरा येथील पोलीस स्टेशन समोर अचानक भीषण आग लागली. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे वीस प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना आज सकाळी दहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गणेश पेठ आगाराची शिवशाही एसटी बस क्रमांक एमएच ०६ बीडब्ल्यू ०९०३ ही बस नादुरुस्त असल्यामुळे दोन दिवसापासून अकोला आगारात उभी होती. तात्पुरती दुरुस्ती करून अकोल्यावरून नागपूरला ही बस बोलावण्यात आली. मात्र गणेश पेठ आगाराचे व्यवस्थापक यांनी विना कंडक्टर बस घेऊन व प्रवासी भरून आणण्यास सांगितल्याचे समजते. त्यानुसार चालक ए आर लासुरकर यांनी आदेशाचे पालन करीत वीस प्रवासी घेऊन अकोल्यावरून नागपूर करिता रवाना झाले.


बडनेरा नजीक एसटी बस मध्ये बिघाड असल्याचे लक्षात येतात. चालक लासुरकर यांनी प्रवाशांना उतरून दुसऱ्या बसमध्ये पाठविले व रिकामी बस घेऊन नागपूरकडे रवाना झाले असता बडनेरा येथील पोलीस स्टेशन समोर अचानक टायर फुटले व बस थांबेपर्यंत शंभर फुटाच्या अंतरावर बस थांबल्यानंतर अचानक टायरने पेट घेतला व काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.


सुरुवातीला नागरिकांनी पाण्याच्या बकेटने पाणी मारून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीने भीषण रूप घेतल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले. बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चव्हाण व पोलीस कर्मचा-यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.


दुर्दैवाने याचवेळी बडनेरा मनपाचे अग्निशामक दल राज्यपालांच्या बंदोबस्ताकरिता बेलोरा विमानतळावर असल्याने अग्निशमन दल येण्यास विलंब झाला. तोपर्यंत बसचा बराच भाग जळून खाक झाला होता. मात्र अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध