Mumbai Local : प्रवाशांची गैरसोय टळणार! आता मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर जलद लोकल थांबणार

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) मोठी अपडेट समोर आली आहे. प्रवाशांचा रेल्वे प्रवास (Railway) सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रयत्न सुरु असतात. अनेकदा गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने रेल्वे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. प्रवाशांचा धाकधुकीचा प्रवास पाहता प्रशासनाकडून रेल्वे वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनाने कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर जलद लोकलला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजेच ‘ऑफिस अवर्स’मध्ये दोन-दोन रेल्वे गाड्यांना (Mumbai Local) या स्थानकांवे थांबा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.



कोणत्या फास्ट लोकल्सना थांबा?



  • कळवा रेल्वे स्थानकात सकाळी ८.५६ ला अंबरानाथहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात सकाळी ९.२३ ला आसनगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • कळवा स्थानकात संध्याकाळी ७.२९ ला मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात संध्याकाळी ७.४७ वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.