पोलीस चकमकीत ३० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात आज, शुक्रवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झालेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान ही चकमक अजूनही सुरू असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नारायणपूर आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचनाक पोलिस पथकावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला सतर्क असलेल्या पोलिस दलाने तत्काळ प्रत्युत्तर दिले. यात काही नक्षलवादी ठार झाले असून पोलिसांना आतापर्यंत ३० मृतदेह गवसले आहेत. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यानंतर ते क्षेत्र सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे देखील एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनही जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे.


विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात विविध चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलांनी १८१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाचा नायनाट करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत मार्च २०२६ पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे, असे शाह म्हणाले होते. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले होते.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा