इराण : इराण, पॅलेस्टाईन, लॅबेनॉन व हिजबुल्लाह-इस्त्रायल यांच्यामध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे जगावर तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे (Third World War) ढग जमू लागले आहेत. १९१४ -१९१८ मध्ये पहिले तर १९३९ -१९४५ दरम्यान दुसरे महायुद्ध झाले, ही दोन्ही महायुद्धे अनुक्रमे चार व सहा अशी एकूण अकरा वर्षे लढली गेली. या युद्धात अनेक देश बेचिराख झाली. लाखो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर आता ८० वर्षाचा काळ लोटला असून आपण पुन्हा तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करू लागलो आहोत. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या रक्तरंजित लढाईमुळे जगावर भितीचे ढग जमू लागले आहेत.
काल रात्री इराणने (Iran) इस्त्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागल्यामुळे आता युद्धाला तोंड फुटले आहे. या हल्ल्यात एक शाळा व हॉटेलचे अतोनात नुकसान झाले आहे. इराणने केलेल्या या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहु यांनी ” इराणने फार मोठी चूक केली असून त्याला त्याची भरपाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.
काल झालेल्या या हल्ल्यात इस्त्रायलचे सात सैनिक ठार झाले आहेत. गेल्यावर्षी हमासने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात १२ शेहून अधिक इस्त्रायल नागरीक ठार झाले होते,तर २४० इस्त्रायल नागरिकांना बंदी केले होते.त्यानंतर मात्र इस्त्रायलने गाझा पट्टी व वेस्ट बँक भागात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत ४० हजारहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यानंतर इराण, लॅबेनॉन व हिजबुल्लाह हे सारे देश हमासच्या समर्थनार्थ पुढे आले आणि संघर्षाची व्याप्ती वाढत गेली. दरम्यान इस्त्रायलने गेल्या सहा महिन्यात इराण, हिजबुल्लाह व हमासच्या अनेक नेत्याना टिपून मारल्यामुळे हिजबुल्लाहने लॅबेनॉनच्या सीमेवर असलेल्या इस्त्रायलच्या वसाहतीवर क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली. या हल्ल्याच्या भितीमुळे हजारो इस्त्रायली नागरिकांना स्थलांतर करावे लागले.
आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतर करता यावे,यासाठी इस्त्रायलदेखील हिजबुल्ल्लाहवर प्रखर हल्ले चढवत आहे,तर जोपर्यंत गाझा पट्टीमध्ये इस्त्रायलचे हल्ले थांबत नाहीत,तोपर्यंत आमचे हल्ले चालूच राहणार, असे हिजबुल्ल्लाहचे म्हणणे आहे.इराणकडून इस्त्रायलवर हल्ला होईल,अशी खबर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने बायडेन प्रशासनाला दिली होती,त्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलला अलर्ट राहण्याचे कळवले होते.पण हिजबुल्लाह इतके मोठे धाडस करेल,असे इस्त्रायलला वाटले नाही व ते गाफील राहिले.गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या या संघर्षाने आता अक्राळ विक्राळ रूप धारण केले असून इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे लॅबेनॉनमध्ये एक हजार नागरिक मृत्युमुखी पडले तर १ लाखाहून अधिक नागरिकांना आपली राहती घरे सोडावी लागली आहेत.काल झालेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सरकारने हिजबुल्ल्लाहच्या महत्वाच्या ठिकाणावर कारवाई करण्यासाठी आपल्या सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.इस्त्रायली सैन्याचे रणगाडे आता लॅबेनॉनच्या सीमेवर मोठ्या संख्येने जमा होत आहेत.
हिजबुल्लाहचे प्रमूख नसरल्लाह याना इस्त्रायलने ठार मारल्यामुळे हिजबुल्ल्लाहने इस्त्रायलविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. या युद्धात भडका उडाल्यास बडी राष्ट्रे उतरण्याची शक्यता लक्षात घेऊन युनोच्या सुरक्षा समितीने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे,पण एकही देश सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.त्यामुळे जग आता तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट होत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…