Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो", मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जम्मू : आज जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीरमधील ही शेवटची सभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, "जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांना भेट देण्याची संधी गेल्या आठवड्यात त्यांना मिळाली आणि ते जिथे गेले तिथे त्यांना भाजपाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला."


पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर चांगलाच निशाणा साधला आहे. "जम्मू-काश्मीरमधील लोक या तीन घराण्यांच्या राजकारणाला खूप कंटाळले आहेत. आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात इथल्या लोकांना नको आहे. लोकांना त्यांच्या मुलांचं चांगले भविष्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच भाजपा सरकारला लोक पाठिंबा देत आहेत. लोकांचा उत्साह जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे" असं म्हटलं आहे.



"हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो"


आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. "आजचीच रात्र होती जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला. आणि त्यावेळी भारताने जगाला दाखवून दिलं होतं की, "हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो" असं मोदींनी सांगितलं. तसंच काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याचा आरोप करत या मुद्द्यावर आजही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचं म्हटलं आहे.


जम्मूच्या जनतेला विशेष आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, "यापूर्वी इतिहासात कधीही अशी संधी मिळाली नाही, जी या निवडणुकीत आली आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार सरकार पहिल्यांदाच स्थापन होणार आहे. ही महत्त्वाची संधी असून ती गमावू नये. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मूतील जनतेचं सर्व दुःख दूर करू." नवरात्री आणि विजयादशमीचा संदर्भ "निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी, नवरात्रीच्या दिवशी येतील आणि यावेळी विजयादशमी ही एक शुभ सुरुवात असेल" असंही मोदींनी म्हटलं.


Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात