कानपूर: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध २८० धावांनी विजय मिळवला होता. आता भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.
कानपूरमध्ये उद्ध्वस्त होणार अनेक रेकॉर्ड
चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली होती. कर्णधार रोहित शर्मा आण विराट कोहली या कसोटीत मोठी खेळी करू शकले नव्हते. मात्र ऋषभ पंत, शुभमन गिल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराहची कामगिरीही जबरदस्त राहिली होती. आता कानपूरमध्येही टीम इंडियाकडून अशाच कामगिरीची आशा राहील. कानपूर कसोटीत काही मोठे रेकॉर्डही उद्ध्वस्त होऊ शकतात.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.