चेन्नईमध्ये ६ ऑक्टोबरला भारतीय वायूसेनेचा चित्तथरारक एयर शो!

Share

नवी दिल्‍ली : भारतीय वायूसेना (Indian Air Force) आपला ९२वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाली असून या निमित्ताने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी चेन्नईच्या (Chennai) आकाशात चित्तथरारक हवाई कसरतींचा समावेश असलेला एयर शो (Air Show) केला जाणार आहे. “भारतीय वायूसेना- सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर” ही या वर्षाच्या कार्यक्रमाची संकल्पना असून देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यामधील अविचल बांधिलकी अधोरेखित करणारी आहे.

या दिवशी चेन्नईच्या जनतेला मंत्रमुग्ध करण्यासाठी वायूसेनेची ७२ विमाने हवाई कसरतींमध्ये सहभागी होऊन आपल्या हवाई कौशल्याचे आणि समन्वयित उड्डाणाचे दर्शन घडवतील. सकाळी ११ वाजता चेन्नईच्या मरिना बीचवर हा कार्यक्रम होणार आहे.

भारतीय वायूसेनेच्या या अतिशय प्रसिद्ध पथकांव्यतिरिक्त वायूसेनेच्या ताफ्यात असलेल्या इतर विमानांच्या हवाई संचलनाचा आणि कसरतींचा देखील हवाई शो मध्ये समावेश आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक आणि वजनाने हलक्या तेजस या लढाऊ विमानाचा, तसेच वजनाने हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड आणि पूर्वीच्या काळी वापरली जाणारी हवाईदलाच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारी डाकोटा आणि हार्वर्ड ही विमाने यांचा देखील यात समावेश असू असेल.

६ ऑक्टोबर २०२४ रोजी मरिना बीचवर होणाऱा हा भव्य शो सर्वांसाठी खुला आहे. हा कार्यक्रम उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव देणारा असेल. यामध्ये भारताच्या हवाई गुणवत्तेचेच नव्हे तर भारतीय वायूसेनेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे, आणि देशाच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यामधील त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचे देखील दर्शन घडेल.

Recent Posts

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

17 minutes ago

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

22 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

45 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

47 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago