Pune News: पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू यांची नाराजी ,पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र…

Share

पुणे: पुणेकरांसाठी पुण्यातील खड्डे हे तर खूपच त्रासदायक ठरतात, आता मात्र या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु २ आणि ३ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांचा मुक्काम पुण्यामधील राजभवनला होता. तिथूनच कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा खूप त्रास झाला. पुणे पोलीसांना राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी कळवली. त्यामुळे आता २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यामध्ये येणार असल्यानं रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगण्यात आलं आहे.

पुण्याच्या अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. या कामांमुळे खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे हे खड्डे महापालिकेने बुजवायचे की महापालिकेने यावरून दोन यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार याआधी झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी खड्डे कोण बुजवणार हे पहावं लागणार आहे. २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येणार आहेत. त्यासोबतच एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर

२६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचे भूमिपूजन देखील त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर ते शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मुक्कामी राहणार आहेत. प्रशासनाकडून त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी मोदी (PM Narendra Modi) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. बारा ते अडीच दरम्यानचा वेळ हा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २७ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

31 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago