उबाठाचे उलटे डोके! त्यात उबाठा सेनेत खोटारड्यांना दुसरा काही धंदा उरला नाही

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली सुषमा अंधारे यांच्या 'फेक नॅरेटिव्ह'ची पोलखोल


'तो चीनमधील व्हिडिओ' थेट चार वर्षांपूर्वीचा


मुंबई : शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'बिग बॉस'मधील एका व्हायरल विधानाचा वापर करत हे खड्डेमय रस्ते महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नसून भारतातीलही नाही, तर थेट चार वर्षांपूर्वीचा चीनमधील आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोस्ट केलेल्या या व्हिडिओमार्फत सुषमा अंधारे यांनी पसरविल्या 'फेक नॅरेटिव्ह'ची पोलखोल भाजपा महाराष्ट्राने केली आहे. विशेष म्हणजे नेटकर्‍यांनीही याबाबत माहिती देऊनही सुषमा अंधारे यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ कायम आहे.


चीनमधील चार वर्षांपूर्वीचा व्हायरल व्हिडिओ पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी लिहिले की, दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द, परिवर्तन तर होणारच. अंधारे यांच्या या व्हिडिओची पोलखोल करत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अंधारे यांच्या 'फेक नॅरेटिव्ह'ची पोलखोल केली.





केशव उपाध्ये यांनी चीनमधील व्हिडिओची लिंक देत ट्विट केले की, 'सुषमाताई, हरकत नाही. उबाठा सेनेतल्या खोटारड्यांना दुसरा काही धंदा तसाही उरला नाही. त्यात तर तुमची नवी संगत तुम्हाला तेच सतत शिकवत असणार. असो. हाच व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा आणि चीनमधला आहे, तुम्ही तोही उलटा केला आणि तसाच वापरला. अर्थात उबाठाचे उलटे डोके तरी कसे चालणार,' असा सवाल उपाध्ये यांनी केला. उपाध्ये यांच्या टीकेसह नेटकर्‍यांनी समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड यांसारख्या महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणार्‍या प्रकल्पांचा आढावा देत सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मात्र, अंधारे यांनी टीकेनंतरही आपली पोस्ट सोशल मीडियावर कायम ठेवली आहे.




Comments
Add Comment

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या