‘असे’ असतील पर्यायी मार्ग
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या वर्धा येथे (Vardha) पी.एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील वाहतूक मार्गावर अनेक बदल करण्यात आले असून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र सोहळ्यादरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी न होण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे याबाबतीत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दरम्यान या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग तसेच पार्किंग स्थळाकडे जाणारा मार्गात बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
परंतु, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सुट देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे.
वाहतुकीस मज्जाव केलेले मार्ग
सेवाग्राम चौक ते गांधी पुतळा : शासकीय रेस्टहाऊस, आरती चौक, धुनीवाला मठ, न्यू आर्टस कॉलेज, आर्वी नाका, पावडे चौक कडून वर्धेकडे येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव केला आहे.
जुनापाणी चौक ते आर्वी नाका : बॅचलर रोड मार्गे पावडे चौक येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव. स्वावलंबी मैदान (सभास्थळ), संत तुकडोजी मैदान (हेलीपॅड) सभोवताली २०० मीटरपर्यंत येणारे सर्व मार्गावर मज्जाव करण्यात आला आहे. बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड मार्गे स्वावलंबी ग्राउंड कडे येणाऱ्या मार्ग. स्वावलंबी ग्राउंड, संत तुकडोजी महाराज मैदान सभोवताली २०० मीटर पर्यंत व आर्वी नाका ते शास्त्री चौक पर्यंत बॅचलर रोड नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या मार्गात बदल
हिंगणघाट, समुद्रपूर या परिसरातील वाहतूक जाम चौरस्ता मार्गे हिंगणघाट, धोतरा, वायगाव चौरस्ता, सेलु काटे, बोरगाव मार्गे वर्धा येथे येईल. शेडगांव फाटा मार्गे येणारी वाहतुक ही सेवाग्राम चौक, बापू कुटी, नांदोरा, मांडवगड टी पाँईट, आष्टा, भुगाव, सेलु काटे रोड, बोरगाव मार्गे वर्धेकडे येईल.
तसेच कारंजा, आष्टी, सेलू परिसरातून येणारी वाहतुक ही साटोडा टी पाँईट, कारला टी पाँईट, जुनापाणी चौक उड्डाणपुल, हिंदी विश्वविद्यालय उड्डाणपूल, शांतीनगर उड्डाणपूल, नागठाणा टी पाँईट, सावंगी टी पाँईट, देवळी नाका दयाल नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गे वर्धा शहराकडे येतील.
वाहन पार्किंग स्थळे
स्वावलंबी डीएड कॉलेज मैदान व जगजीवन राम शाळेसमोरील मैदान, सर्कस ग्राऊंड रामनगर व शितला माता ग्राऊंड येथे व्हीआयपी यांचे वाहनाकरिता पार्किंग. जे.बी. सायन्स कॉलेज मैदान, इदगाह मैदान, कोचर मैदान गणेश नगर, यशवंत जिनींग ग्राऊंड, मॉडेल हायस्कूल ग्राऊंड शिवनगर येथे बसेस व ट्रॅव्हल्स करिता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिंदी मेघे ग्रामपंचायत ग्राऊंडवर चारचाकी वाहनाकरिता, अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज रामनगर येथे दुचाकी वाहनासाठी, संत तुकडोजी शाळा मैदान व पोलीस स्टेशन रामनगर मैदान येथे पोलीस वाहनांकरिता, न्यू इंग्लिश शाळा मैदान व केसरीमल कन्या शाळा मैदान येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक यांची चारचाकी वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.