Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीStree 2 Collection : स्त्री २'ने रचला इतिहास! ठरला हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर...

Stree 2 Collection : स्त्री २’ने रचला इतिहास! ठरला हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर १ हिंदी चित्रपट

मुंबई : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या ‘स्त्री-२’ (Stree 2) चित्रपटाचे चाहते प्रतिक्षेत होते. अखेर ६ वर्षानंतर १५ ऑगस्ट रोजी स्त्री २ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसला (Box Office) पछाडून सोडलं. अजूनही श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘स्त्री २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या सिनेमाची दररोज कोट्यावधींची कमाई होत असून दररोज वेगवेगळे रेकॉर्ड बनत आहेत. अशातच महिन्याभरात या चित्रपटाने बॉलिवूडमधल्या सर्व चित्रपटांना मागे टाकून रेकॉर्ड तयार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये ‘स्त्री 2’ चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या Maddock Films ने याला दुजोरा दिला आहे. या फिल्मसने एक्सवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत  ‘भारताच्या बॉक्स ऑफिसवरील पहिल्या क्रमांकाचा हिंदी चित्रपट’ असे लिहले आहे. तसेच ”ती स्त्री आहे आणि तिने करुन दाखवले, हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर 1 हिंदी चित्रपट”, असेही कॅप्शनमध्ये लिहले आहे.

त्याचबरोबर, आमच्यासह हा इतिहास रचण्यासाठी सर्वाच चाहत्यांची खूप सारे आभार. स्त्री २ अद्यापही चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे सुरु आहे. चित्रपटगृहांमध्ये या, आणखी काही रेकॉर्ड्स रचूयात’, असेही लिहले आहे.

‘स्त्री २’ने आतापर्यंत किती कमावले?

आतापर्यंत स्त्री २’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५८६ कोटी कमावले आहेत. तर यापुढे ६०० कोटी क्लबचे उद्घाटन करत आहे. दरम्यान, पाचव्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी, सोमवारी ३.१७ कोटी, मंगळवारी २.६५ कोटी कमावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -