"नवरा माझा.." झळकतोय बाटलीवर!

मुंबई : चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यात आता पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या पॅकेजिंगवर झळकणं हा नवाच प्रकार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून तो मान "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाला मिळाला आहे आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.


"नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे.


"नवरा माझा नवसाचा २" हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.


अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही