नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबध्द आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.
कृषी उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढविण्याच्या उद्देशाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करणे असो किंवा खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवणे असो, अशा निर्णयांमुळे आपल्या अन्नदात्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयांमुळे त्यांचे उत्पन्न वाढणार आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.
’देशाच्या खाद्य सुरक्षेसाठी रात्रंदिवस परिश्रम करणा-या आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे हित साधण्यासाठी आमचे सरकार कोणतीही कसर ठेवत नाही. मग यामध्ये कांदा निर्यातीवरील शुल्क कमी करणे असो अथवा खाद्य तेलांवरील आयात शुल्क वाढविणे असो; आम्ही घेतलेल्या अशा अनेक निर्णयांचा खूप मोठा लाभ आपल्या अन्नदाता शेतक-यांना होणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचे उत्पन्न वाढेल, तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधीही वाढतील.’
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…