रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गणपती उत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश विसर्जनानंतर हजारो प्रवासी परतत असताना रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, मुसळधार पाऊस, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
इंदापूर ते कोलाडदरम्यान २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे. कोकणातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने मुंगीच्या गतीने सरकत आहेत. याशिवाय, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणखीनच तीव्र झाली आहे.
एसटी महामंडळाने २,५५३ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे, मात्र ती देखील अपुरी ठरत आहे. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्या प्रवाशांची गरज भागवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्टेशनांवरही प्रचंड गर्दी झाली आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, आणि लहान मुलांना होत आहे. चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत.
परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…