Monday, October 7, 2024
Homeक्राईमCrime : अमरावतीला येणारा लाखो रुपयांचा गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत!

Crime : अमरावतीला येणारा लाखो रुपयांचा गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत!

अमरावती : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटख्याची मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी मोठी खेप धारणी (Gutkha Seized) पोलिसांनी पकडली. ट्रकमधून सुमारे २५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. एकूण ३५ लाखांचा हा मुद्देमाल आहे. अमरावती- बडनेरा येथील गुटखा तस्करांसाठी हा माल आणला जात असल्याचे ताब्यात घेतलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरहून अमरावती येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटख्याची मोठी खेप येत असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ढाकणा फाट्यावर सापळा रचून एमपी ०९ जीएफ ९४८३ क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी तपासणी केली. वायरच्या गुंडाळ्यांमागे पोत्यांमध्ये दडविलेला २५ लाखांचा माल आढळून आला. पोलिसांनी मुद्देमालसह ट्रक जप्त केला.

पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे. या प्रकरणाचे तार अमरावती शहरातील गुटखा तस्करांशी जुळून आले आहेत. यासंदर्भात धारणीचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव म्हणाले की गोपनीय माहितीवरून नाकाबंदी करून ट्रकची झडती घेतली. त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळला. ट्रकसह ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची माहिती

चालक जयश मिश्रा आणि वाहक रामलाल मेहरा यांना देखील अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक सतीश झाल्टे, ईश्वर सोळंके, पोलिस अंमलदार शेख गणी, राम सोळंके, कृष्णा जामूनकर, संजय मिश्रासह इतर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -