iPhone 16 सीरिज झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Share

मुंबई: Appleने iPhone 16लाँच केला आहे. लीक रिपोर्ट्समध्ये माहिती मिळाली होती की कंपनीने कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल केला आहे. म्हणजेच या फोनमध्ये नवे डिझाईन मिळेल. कंपनीने यात पिल शेप्ड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन A18 प्रोसेसरसह येतो. iPhone 16 आणि iPhone 16 plusमध्ये तुम्हाला एकसारखे फीचर्स मिळतील.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ बॅटरी आणि डिस्प्लेच्या साईजमध्ये अंतर आहे. यात तुम्हाला नवा कॅमेरा कॅप्चर बटनही मिळेल. कंपनी अॅपल इंटेलिजेन्सचा सपोर्ट एका सॉफ्टवेअर अपडेटसोबत देईल. याला केवळ इंग्रजी भाषेत लाँच केले जात आहे. मात्र लवकरच दुसऱ्या भाषांमध्ये अपडेट येईल.

iPhone 16मध्ये युजर्सला चांगले स्क्रीन प्रोटेक्शन देण्यात आले आहे. iPhone 16मध्ये तुम्हाला ६.१ इंच आणि iPhone 16 Plusमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळेल. स्क्रीन ब्राईटनेस २०००nits आहे. यात कॅमेरा कॅप्चर बटन देण्यात आले आहे.

याचा वापर करून तुम्ही एका क्लिकमध्ये कॅमेरा अॅक्सेस करू शकता. स्मार्टफोनमध्ये A18चिपसेट देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा प्रोसेसर केवळ स्मार्टफोनच नव्हे तर अनेक डेस्कटॉपला टक्कर देऊ शकतो.

यात तुम्हाला चांगली बॅटरीही मिळेल. यात Apple Intelligence फीचर मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे फीचर प्रायव्हसीबाबत विशेष ध्यान ठेवण्यात आले आहे. यात प्रायव्हेट क्लाउड कम्प्युटरचा वापर करण्यात आला आहे. यात युजर्सला चांगली सिक्युरिटी मिळेल.

यासोबतच कंपनीने व्हिज्युअल इंटेलिजेशन फीचर दिले आहे. याच्या मदतीने तुम्ही केवळ कॅमेऱ्याचा वापर करून अधिक माहिती एका क्लिकमध्ये मिळवू शकता.

iPhone 16ची किंमत ७९९ डॉलर(म्हणजेच साधारण ६७ हजार रूपये)पासून सुरू होईल. ही किंमत १२८ जीबी स्टोरेजची आहे. तर iPhone 16 plusची किंमत ८९९ डॉलर(साधारण ७५,५००रूपये)पासून सुरू होईल. ही १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत असेल.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago