Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल

  90

गणेशभक्तांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग फुलला


रत्नागिरी : कोकणवासीयांच्या प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. कोकण रेल्वेच्या विशेष आणि नियमित गाड्या खचाखच भरून येत असून खासगी वाहने, बसेस तसेच एसटी गाड्यांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत आहे.


गेल्या दोन दिवसांपासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील धामणी पेट्रोल पंपापासून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


वाहतूक सुरळित करण्यासाठी संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक अमित यादव स्वतः रस्त्यावर उतरले होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुंबई-गोवा महामार्ग गणेशभक्तांच्या वाहनांमुळे फुलून गेला आहे. हजारो वाहने रस्त्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असून वाहतूक सुरळित होण्यासाठी स्थानिक पोलीस मदत करीत आहेत.


कोकण रेल्वेनेही नियमित गाड्यांच्या बरोबरीने मुंबई, पुणे तसेच गुजरातमधून जादा गाड्या सोडल्या आहेत. आज आणि उद्या (दि. ६ आणि ७ सप्टेंबर) सर्वाधिक गाड्या या मार्गावर धावत आहेत. या सर्व गाड्यांमधून आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांवर लक्षावधी प्रवासी कोकणात दाखल होत आहेत.


Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना