Ek Daav Bhutacha : सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा'!

  176

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Cinema) मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. "दे धक्का" सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता "एक डाव भूताचा" (Ek Daav Bhutacha) या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.


रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.


सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss 19 Update : प्रणित मोरेवर सलमानचा घणाघाती प्रहार! प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा, म्हणाला... मर्यादा ओलांडलीस

मुंबई : ‘बिग बॉस १९’चा पहिला आठवडा प्रेक्षकांसाठी जबरदस्त मसालेदार ठरला आहे. घरात रोज कुठेतरी वाद, भांडणं आणि

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

Swwapnil Joshi: मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा...घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी स्वप्नील जोशीचं आवाहन

मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक