Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीजिओ रोटी घर व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनाइज़ेशन्स तर्फे के.व्ही.हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना...

जिओ रोटी घर व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनाइज़ेशन्स तर्फे के.व्ही.हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप

जव्हार(मनोज कामडी)- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के.व्ही.हायस्कूल व आर.वाय. ज्युनिअर कॉलेज,जव्हार येथे राजेश रसिकलाल शाह, मितेश रसिकलाल शाह यांच्या रावजी फाईन फ्राग्रान्सस जिओ रोटी घर सायन,मुंबई व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, मुंबई यांच्यातर्फे विद्यालयाच्या गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण करण्यात आले .
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करण्यात आले.

विद्यालयाच्या गीतमंचाने सुमधूर स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आजच्या काळातील स्वार्थी व संवेदनाशून्य जगात जिओ रोटी घर व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे रसिकलाल व मिहीर शहा बंधू व ईशा नाईक हे दानशूर दाते गरजवंत व गरीबांचे कैवारी – आशेचे किरण होवून जगासमोर येतात हे आशादायक चित्र म्हणावे लागेल असे विद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी सांगितले .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोखले एज्युकेशन सोसायटी शाखा सचिव प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम, प्रमुख अतिथी करिश्मा नायर सहाय्यक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार, ईशा नाईक संस्थापक सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, कुस्मिता तिवारी , प्रसिद्ध हिंदी मालिका अभिनेत्री व सहकारी बिंटू रावत , पालक शिक्षक संघाच्या सहसचिव प्रीती पाटील प्रा. डॉ.विनायक खताळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार केंद्राचे शाखा सचिव प्रिं. डॉ .मनोहर मेश्राम यांच्या हस्ते मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या सवलती व योजनांचा लाभ घेवून स्वतःचा व समाजाचा विकास साधावा असे आवाहन केले . कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ईशा नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मेहनत घेण्याचे तसेच कुठल्याही परिस्थितीत न डगमगण्याचे आणि शिक्षण निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन केले. सुनिता तिवारी यांनीही आपल्या भाषणात मेहनती करण्याची तयारी व चिकाटी आपल्या अंगी राहू द्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रिं.डॉ.मनोहर मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीचा दुर्गम भागातील आतापर्यंतचा प्रवास सांगितला. तसेच प्रत्येक विद्यार्थी मेहनती आणि चिकाटीने खूप पुढे जाऊ शकतो,प्रत्येकाला समान संधी असतो असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

सायकल वाटप लाभार्थी विद्यार्थिनींच्या नावांची यादीचे वाचन शिक्षक घाणे सर यांनी केले. लाभार्थी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. एकूण २५ लाभार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक खंडागळे सर यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक जे. पी. महाले सर यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -