Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीVisfot Movie : रितेश देशमुख अन् प्रिया बापट एकत्र झळकणार थ्रिलर हिंदी...

Visfot Movie : रितेश देशमुख अन् प्रिया बापट एकत्र झळकणार थ्रिलर हिंदी चित्रपटात! ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सध्या ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे तुफान चर्चेत आहे. यंदा पहिल्यांदाच रितेश देशमुख ‘बिग बॉस’च्या होस्टिंगची जबाबदारी निभावत आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’ला आणि विशेषत: भाऊच्या धक्क्याला अफाट टीआरपी मिळत असताना अभिनेत्याने आणखी एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. रितेशची प्रमुख भूमिका असलेला एक नवीन थ्रिलर चित्रपट येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया बापट (Priya Bapat) व रितेश देशमुख ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘विस्फोट’ ( Visfot ) हा हिंदी थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कूकी गुलाटी यांनी केलं असून नुकताच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

‘विस्फोट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका प्रिया बापटने साकारल्याचं स्पष्ट होत आहे. एकीकडे बायकोचं बाहेर अफेअर अन् दुसरीकडे किडनॅप झालेला मुलगा, या दोन्ही गोष्टींतून हिरो मार्ग कसा काढणार याचा उलगडा ‘विस्फोट’ ( Visfot ) या चित्रपटातून होणार आहे. याशिवाय फरदीन खान साकारत असलेल्या पात्राच्या आयुष्यात देखील अनेक चढउतार येत असल्याचं या चित्रपटात पाहायला मिळतंय.

https://www.instagram.com/reel/C_aPVLpivaR/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

‘विस्फोट’ ( Visfot ) हा चित्रपट ‘रॉक, पेपर, सिजर्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. येत्या ६ सप्टेंबरला जिओ सिनेमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रितेश देशमुख व फरदीन खान यांची जोडी ‘हे बेबी’ या चित्रपटानंतर ‘विस्फोट’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेश अन् प्रिया देखील एकत्र झळकणार असल्याने मराठी प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -