Pune News : गणेशोत्सवात महिलांची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना चाप लावणार!

भर चौकात छायाचित्र लावून धींड काढणार; पोलीस आयुक्तांचे आदेश


पुणे : गणेशोत्सवात महिला, तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना चाप लावण्यात येणार आहेत. छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र भर चौकात लावणार आहेत. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.


गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (७ सप्टेंबर) होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात. मध्यभागातील उत्सवाच्या कालावधीत गर्दी उसळते. गर्दीत तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. बंदोबस्तावरील पोलिसांनी छेड काढणाऱ्यांवर त्वरित कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांचे दागिने चोरणे, तसेच मोबाइल संच चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्यभागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


महिला पोलिसांची पथके, तसेच दामिनी पथक गर्दीत गस्त घालणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मध्यभागात गस्त घालणार आहेत. गर्दीत महिलांची छेड काढणारा, तसेच अश्लील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्र काढण्यात येणार आहे. छेड काढणाऱ्याचे नाव, पत्ता, छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे पोलिसांकडून फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत. सडक सख्याहरींची पोलिसांकडून धिंडही (परेड) काढण्यात येणार आहे.



मध्यभागात मदत केंद्रे


उत्सवाच्या काळात शहरातील मध्यभागात अठरा पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्रांचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रात स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत.



शीघ्रकृती दल तैनात


उत्सवाच्या कालावधीत सहा ठिकाणी शीघ्रकृती दल तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत शीघ्र कृती दल तैनात राहणार आहे. शीघ्र कृती दलातील जवान मनोऱ्यावरून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीतील गैरप्रकार, तसेच संशयितांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय