जव्हार(मनोज कामडी)- जव्हार तालुक्यातील जुनीजव्हार ग्रामपंचायत मध्ये “ग्रामपंचायत आपल्या दारी” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी १० वाजता कशिवली न. २ येथे संपन्न झाला सदर उपक्रमाला ग्रामपंचायत मधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गरजू घटकांना गरीब,अशिक्षित,निराधार,अपंग,विधवा , परितक्त्या,भूमिहीन यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाव्दारे ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी कर्मचारी स्वतः प्रत्येकाच्या दारी जाऊन त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन प्रत्येक कुटुंबाची संपूर्ण माहिती संकलित करून ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
ग्रामपंचायत मधील नागरिकांकडे स्वतःचे आधारकार्ड, जातीचा दाखला,जॉब कार्ड, रेशन कार्ड मतदान कार्ड, वनपट्टा नाहीत तसेच जे निराधार,अपंग, विधवा, परीतक्त्या महिला तसेच ६५ वर्षांवरील प्रौढ लोक आहेत त्यांना शासनाच्या विविध योजना असून त्यांच्या अशिक्षितपणा गरिबी आणि वारंवार शासन दरबारी माराव्या लागणाऱ्या फेऱ्या यामुळे बरीच लोक या योजनांपासून वंचित राहत असतात. तसेच गावातील लोकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी, कुपोषण, वीज यांसारख्या अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असून परंतु या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.
दैनंदिन जीवन जगत असताना लोकांना येणाऱ्या समस्या समजून घेऊन ग्रामपंचायत म्हणून उपाययोजना करण्यासाठी आणि योग्य निजोजन करून त्या समस्या नक्कीच ग्रामपंचायत दूर करू शकेल. आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाच्या दरात जाऊन त्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे . या उपक्रमाव्दारे आलेल्या माहितीचे विश्लेषण करून या गोरगरीब लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सन्मनिय सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अशा कार्यकर्त्या, रोजगार सेवक, MPW प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, उमेद सीआरपी हे स्वतः प्रत्येकाच्या दारी जाऊन लोकांना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करून संकलित महितीच्या आधारे ज्या लोकांकडे आधार कार्ड, जातीचा दाखला मतदान कार्ड,रेशन कार्ड, जॉब कार्ड, वनपट्टा नाही तसेच जे अपंग निराधार, विधवा, परीतक्त्या, महिला शासनाच्या लाभापासून वंचित आहेत यासाठी दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी दाखले वाटप शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत जुनिजव्हार कार्यालयात केले असल्याची माहिती सर्वाना दिली. जेणे करून एका दिवसात या सर्व लोकांना अपेक्षित कागदपत्र व शासनाच्या योजनाचा लाभ घेता येईल.
या उपक्रमाचे उद्घाटन काशिवली २ येथे करून सर्वात प्रथम उपक्रमाचा उद्देश आणि संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त युवा सरपंच निलेश भोये यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व सदर उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची संपूर्ण टीम ग्रामपंचायत मधील प्रत्येक कुटूंबाच्या दारात जाऊन त्यांना येणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच सदर उपक्रम हा जुनीजव्हार ग्रामपंचायत मधील सर्व गाव पाड्यात या उपक्रमाचे आयोजन केले जाईल असे सांगितले.या उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त युवा सरपंच निलेश भोये, उपसरपंच संजय भोये, ग्रामसेवक संदीप घेगड, ग्रामपंचायत सर्व सन्मानित सदस्य,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष राजु भोये , सामजिक कार्यकर्ते लकी भोवर, महादू भुसारा, यशवंत महाले, राजेश भोये, तसेच गावातील शाळेचे मुख्याध्यापक,
शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्ता रोजगारसेवक, आरोग्य सेवक, परिचारिका , गावातील महिला बचत गट कार्यकर्त्या ,सरकारी कर्मचारी ,गावातील युवा तरुण, ग्रामस्थ हे सर्वजण उपस्थित होते.