मुंबई:नोकरी करणाऱ्या लोकांसाठी रिटायरमेंटनंतर दर महिन्याला इनकम मिळवणे सोपे नसते. जर नोकरी करत असताना तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर हे काम सोपे होते. तसेच रिटायरमेंटनंतरही तुम्हाला दरमहा पैसे मिळत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू महिन्याला कमाई करू शकता. ही एक सरकारी योजना आहे. रिटायरमेंट प्लानिंगसाठी ही प्रसिद्ध योजना आहे.
पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना वरिष्ठ नागरिक बचत योजना आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला २० हजार रूपये देऊ शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत ८.२ टक्के व्याजदरही मिळते. यात महिन्याला गुंतवणूक करण्यापेक्षा एकचा पैसे टाकता येतात.
कोण करू शकते गुंतवणूक
यात केवळ ६० वर्षांच्या वरील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. या योजनेवर सध्या ८.२ टक्के व्याज मिळत आहे. कोणतीही भारतीय व्यक्ती जिचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे ते या योजनेत एकरक्कम भरू शकतात. या योजनेत अधिकाधिक ३० लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. आधी ही रक्कम १५ लाख रूपये होती.
महिना २० हजार कसे मिळतील
जर तुम्ही सीनियग सीटिझन सेव्हिंग स्कीममध्ये ३० लाख रूपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दरवर्षी २ लाख ४६ हजार रूपयांचे व्याज मिळेल. जर महिन्याची रक्कम काढायची झाली तर ही रक्कम २०,५०० रूपये होते.