Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडी“एक पेड मा के नाम": कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्टला...

“एक पेड मा के नाम”: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्टला राबवली जाणार मोहीम

जव्हार(प्रतिनिधी) – भारताच्या माननीय पंतप्रधानांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने “एक पेड मा के नाम ग्लोबल कॅम्पेन सुरू केले आहे . जागतिक अभियानाचा एक भाग म्हणून, सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात २० जून २०२४ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये व्यक्तींनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले.

या मोहिमेचा एक भाग म्हणून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्ट रोजी मोहीम राबविण्यात येत आहे . भारत सरकारच्या माननीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांतर्गत, मंत्रालय आयएआरआय कॅम्पसमध्ये सुमारे १ एकर जागेत “मातृ वन” स्थापित करेल. जिथे माननीय कृषिमंत्री आणि मंत्रालयाचे अधिकारी / कर्मचारी रोपे लावतील. वृक्षारोपण कार्यक्रम २९ ऑगस्ट २०२४ सकाळी १०:००वाजता आयएआरआय कॅम्पस, पूसा, नवी दिल्ली येथे सुरू होईल. देशातील डीए अँड एफडब्ल्यू, आयसीएआर संस्था, सीएयू, केव्हीके आणि एसएयूच्या सर्व अधिनस्थ कार्यालयांना देखील त्याच दिवशी आणि वेळेत आपापल्या ठिकाणी समान वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यास सूचित केले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत ८०० हून अधिक संस्था सहभागी होणार असून या कार्यक्रमात ३००० ते ४००० रोपांची लागवड केली जाणार आहे.

‘एक पेड मा के नाम ‘ अभियान ही एक जनचळवळ असून लोक वृक्षारोपण करून आपल्या मातेला आणि पृथ्वीमातेला मानवंदना देत सहभागी होत आहेत. वृक्षारोपणामुळे सरकारने सुरू केलेले उद्दिष्ट देखील पूर्ण होते जे पर्यावरणपूरक जीवनशैलीची एक लोकचळवळ आहे. शेतीमध्ये शाश्वत शेती साध्य करण्यासाठी वृक्षलागवड हे महत्त्वाचे पाऊल आहे. माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढविण्यास झाडे मदत करतात. लाकूड व बिगर लाकूड उत्पादनातून ही झाडे अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देतात. या अभियानात जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरण रोखण्याची आणि ती बदलण्याची भरपूर क्षमता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -