Coriander Water Benefits: दररोज एक ग्लास प्या धण्याचं पाणी शरीराला मिळतील ‘हे’ भन्नाट ५ फायदे

आपल्या घरी किचनमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. मात्र त्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. अशीच एक गोष्ट म्हणजे धणे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये धण्याचा चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. धण्यामध्ये भरपूर मिनरल्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही धणे पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतरही अनेक फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया धण्याचं पाणी पिण्याचे फायदे...

 

शरीरातील सूज कमी होते


धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात ज्यामध्ये फ्लावोलॉयड्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यासाठी धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूजही कमी होते.

पचनक्रिया चांगली राहते


पहाटे रोज उठून तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहण्यात मदत होते. धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होतात जसं की, अ‍ॅसिडिटी, पोटदुखीही, आणि गॅस दूर होते.


वजन नियंत्रणात राहतं


धन्याच्या पाण्याचं सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर जास्त प्रमाणात असतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. आणि अन्न पचनास होण्यास मदत होते, व पोट जास्त वेळ भरून राहतं.

हृदयासाठी फायदेशीर


धण्यामध्ये फायबर आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक, सारख्या समस्यांचा धोका उद्भवत नाही.

विषारी पदार्थ बाहेर टाकतील


किडनी साफ होण्यास धण्यांच्या पाण्याची मदत होते, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. तसंच शरीरातले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते.

 

 

 
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे