भ्रष्टाचाराच्या बाता मारणा-या संजय राऊतांना आमदार नितेश राणे यांचे चोख प्रत्युत्तर
मुंबई : राज्यातील पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसून मविआचे गृहमंत्री पोलिसांच्या बदलीचे सौदेबाजी आणि वसुली करायचे. तसेच मविआच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरक्ष: घरघडीसारखे वागवायचे. या लोकांनी पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभी केली आहे, त्यामुळे संजय राजाराम राऊत या बदल्यांसंदर्भात थोबाड उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.
नरेंद्र मोदी विश्वगुरु तर उद्धव ठाकरेला कुत्रंही विचारत नाही
संजय राजाराम राऊतचा मालक केवळ फोटोशूटसाठी आंतरराष्ट्रीय देशात जातो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही देशात पाय ठेवतात तिकडे त्यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो भारतीयांची गर्दी जमते. पण त्याच जागी उद्धव ठाकरे गेले तर त्याला कुठला कुत्रंही विचारत नाही. म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरु आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले.