मुंबई: मोहम्मद शमी(mohammad shami) बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र तो आता पुनरागमनासाठी सज्ज झालाय. शमीने नुकताच नव्या लूकमध्ये समोर आला. त्याने आलिम हकीम यांच्याकडून केस कापून घेतले. आलिमने शमीच्या आधी विराट कोहली आणि महेंद्रसिगं धोनीचे केसही कापले आहेत. एका रिपोर्टनुसार एका सेशनसाठी आलिम १ लाख रूपये चार्ज करतात. शमीने नव्या हेअर कटनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स दिसत आहेत.
आलिम हकीम देशातील मोठे स्टायलिस्ट मानले जातात. शमी हेअरकटसाठी त्यांच्याकडे पोहोचला होता. शमीने हेअरकट केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले. शमीने कॅप्शनमध्ये लिहिले, नयू लूक, सेम हसल. यावर लाखो लोकांनी लाईक्स केले आहेत.
View this post on Instagram
आलिम हकीमने टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची स्टाईल केली आहे. एका बातचीतदरम्यान त्यांनी सांगितले होते की ते एका सेशनसाठी १ लाख रूपये चार्ज करतात. आलिम विराट कोहलीच्या हेअर कटनंतर चर्चेत आले होते. यानंतर युवराज सिंग, सूर्यकुमार यादव, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी, रणवीर सिंह, विक्की कौशल आणि हार्दिक पांड्यासह अनेकजण त्यांच्याकडे गेले होते.
शमी वनडे वर्ल्डकप २०२३नंतर संघाबाहेर आहे. तो दुखापतग्रस्त झाला होता. शमीने यानंतर सर्जरी केली होती. आता कमबॅकसाठी तो पूर्णपणे तयार आहे. शमीने भारतासाठी आतापर्यंत १०१ वनडे सामने खेळले आहेत. .यादरम्यान त्याने १९५ विकेट घेतल्या आहेत. एका डावात ५७ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आ