दुबई: भारताची स्टार खेळाडू आणि उप कर्णधार स्मृती मंधाना मंगळवारी २० ऑगस्टला महिलांच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये एका स्थानांनी पुढे जात तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मंधानाकडे ७३८ रेटिंग गुण आहेत. तर वनडे प्रकारात भारताची अव्वल रँकिंगची फलंदाज आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या यादीत आपले नववे स्थान कायम राखले आहे.
श्रीलंकेची दिग्गज फलंदाज चमारी अट्टापट्टू तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. तर संघातील तिच्या सहकारी फलंदाज नीलाक्षिका डी सिल्वा ३२व्या, हर्षित समरविक्रमा ४४व्या स्थानावर तर कविशा दिलहारी ५०व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. मंधाना टी-२० आंतरराष्ट्र्रीय रँकिंगमध्ये चौथे स्थान कायम राखून आहे. समरविक्रमा आणि आयर्लंडची सलामी फलंदाज गॅबी लुईसने करिअरमधील सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे.
आयपीएलमध्ये जे काम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला अजूनपर्यंत करता आले नाही ते वुमन्स प्रीमियर लीगमध्ये स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील बंगळुरू संघाने करून दाखवले. मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. स्मृती मंधानाने २०१६मध्ये पहिले वनडे शतक ठोकले होते. तिने होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०९ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…