Pune News : पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन!

  70

वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद


पुणे : जुलै महिन्यापासून राज्यभरात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. अशातच स्वातंत्र्यदिन यादिवशी पात्र महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महिलावर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज पुणे शहरातील बालेवाडी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. या दरम्यान बालेवाडी परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे.



कोणते मार्ग बंद?


पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंतचे सर्व सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यावेळेत फक्त कार्यक्रमात सहभागी होणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना बांतर भवन आणि बालेवाडीतील इतर परिसरात पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते देखील बंद ठेवण्यात येणार आहे. आज शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीचे हे बदल लागू असतील.


त्याचबरोबर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक देखील अवजड वाहनांसाठी बंद राहील. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत केली जाईल.

Comments
Add Comment

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव