जव्हार येथील २०० खाटांचे रुग्णालय ढिसाळ धोरणामुळे पूर्णत्वास विलंब!

प्रशासन जनता दरबारात खडबडून जाग; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रशासनाला निर्देश


जव्हार : पालघर जिल्यातील जव्हार हा अतिदुर्गम तालुका आधीच कुपोषणाचा शाप पालघर जिल्हा होऊन ८ वर्षे उलटली पण जव्हार तालुका आरोग्य व्यवस्थेपासून खूप दूर आहे. कुपोषणाचं मुळ कारण हे जरी भुक असलं तरीही आज १०० खाटांचे रुग्णालय कुचकामी ठरत आहे. आज १०० खाटा असून १६० लोक रुग्णालयात दाखल असतात. सन २०११ ला दिवंगत आमदार यांनी शासकीय पद मंजूर केली पण तो शासन निर्णय मात्र कागदावरच राहीला.


या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यासाठी कॅप्टन विनित मुकणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जव्हारसाठी २०० खाटांचे रुग्णालय मागितले रुग्णालय मंजूर देखील झाले. परंतु २०१९ ते आज तागायात रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे जागेअभावी लाल फीतीत आहे.


जव्हार चे राजे महेंद्रसिंह मुकणे यांनी २०१९ साली जागा देण्यासाठी पुढाकार घेतला आणि जिल्हाधिकारी पालघर यांना लेखी पत्राद्वारे प्रत्यक्ष कळविले. पण करारनामा २०२३ ला देताना जाचक अटी टाकल्या ज्या शासन मान्य करू शकत नाही. हे सगळं वाचल्यावर मन सुन्न झालं, यानंतर स्वतः पुढाकार घेंवून शासनाची १३.८५ एकर शासकीय जमीन शोधली पण प्रशासन अद्यापही सुन्न आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.


आज ९० कोटी निधी ३ वर्षांपासून येऊन पडलाय पण प्रशासन कारणं देण्यात मग्न आहे. ७६ वर्ष स्वतंत्र होऊनही ही परिस्थिती असेल तर २०१९ ते २०२४ पर्यंत कित्येक निष्पाप बळी केवळ रुग्णालय अभावी मयत झाले हा लोकशाही मधे एक प्रकारचा सदोष मनुष्य अवधानाचा गुन्हा म्हणावा लागेल अनेक रुग्ण वाचले पाहिजे ही भावना आज प्रत्येक जव्हारकर व्यक्त करतो. पण आमच्या आदिवासी बांधवांच्या जीविताचे मोल आज ही शून्य आहे. हे या सरकारी अनास्थेहून दिसून येत. आपण मूलभूत अधिकार देऊ शकत नसु तर प्रशासन कश्यासाठी काम करतंय हे कळण्याइतपत सुजाण नागरिक आपल्याकडे नाहीत का?


स्वतंत्राची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण खरोखर त्या ७५ वर्षे साजरी करण्यास पात्र आहोत का की प्रत्येक गोष्ट झगडून भांडुन आंदोलनातूनच मिळेल .


लोकशाहीचा ४ था स्तंभ म्हणुन जाब विचारणार पण लोकप्रतिनिधी केंव्हा जागे होणार हा मोठा प्रश्न आहे. आजतागायत वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावलेल्यांची संख्या प्रचंड वाढत आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न अधोरेखित आहे.



सरकारचे प्रयत्न फलित होतील


आज पालकमंत्री ना रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनला सुचना देऊन ७ दिवसाच्या आत हा विषय मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. सरकार प्रयत्नशील आहे हे जरी दिसत असलं तरी प्रयत्नाची परकाष्ठा करावी लागते. कदाचित त्याच फलित होईल अस म्हणन्यास हरकत नाही. जव्हार विकसित होण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याची माझी तयारी आहे, असे कॅप्टन विनीत मुकणे जव्हार यांनी म्हटले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये