Vanchit Bahujan Aghadi : विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह!

  150

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीबाबत (Vanchit Bahujan Aaghadi) एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी 'गॅस सिलेंडर' हे चिन्ह दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला पाचपैकी चार मतदारसंघांत तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह दिले होते.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वंचितला एकच निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले होते. आता विधानसभेला निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर चिन्ह दिलं आहे.


Comments
Add Comment

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक