तैपेई : तैवानमध्ये (Taiwan Earthquake) चार महिन्यांपूर्वी भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात नऊ मिनिटांत सतत पाच धक्के जाणवले. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले होते. त्यानंतर काल तैवानच्या ईशान्य भागात ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे प्रकरण ताजे असताना आज तैवानच्या पूर्वेकडील हुलियान शहरापासून ३४ किमी अंतरावर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या ९.७ किमी खोलीच्या भूकंपामुळे तैपेईमधील इमारतींना हादरे बसले. दरम्यान, यामध्ये अद्याप कोणत्याही नुकसानीची माहिती मिळाली नाही.
Taiwan Earthquake : तैवान हादरलं! २४ तासांत दोनवेळा बसले भूकंपाचे धक्के
