अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात सुरू असलेल्या अमेरिकन नौदल नाकेबंदीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या कारवाईला “जीनियस” असे संबोधत स्पष्ट केले की, जोपर्यंत इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करत नाही, तोपर्यंत कोणताही करार होणार नाही. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीचे जोरदार समर्थन करत ती पूर्णपणे यशस्वी आणि “फुलप्रूफ” असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, यामुळे अमेरिकी नेव्ही ची ताकद स्पष्टपणे दिसून येते आणि आता कोणताही देश अमेरिकेसमोर हुशारी करू शकणार नाही.
- अपघात की टार्गेट किलिंग? पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातून पुन्हा एकदा एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. भारतासाठी दीर्घकाळ धोकादायक ...
ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की कोणताही करार तेव्हाच शक्य आहे, जेव्हा इराण अण्वस्त्र निर्मितीचा मार्ग पूर्णपणे सोडेल. त्यांनी हेही नमूद केले की दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे, मात्र आता ती प्रत्यक्ष भेटीऐवजी फोनद्वारे होत आहे.ट्रम्प यांच्या मते, या नाकेबंदीमुळे इराणची अर्थव्यवस्था गंभीररीत्या प्रभावित झाली असून देश मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अहवालांनुसार, या नाकेबंदीचा जागतिक तेलपुरवठा आणि व्यापारावरही परिणाम झाला असून तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
राजनैतिक प्रयत्नांबाबत ट्रम्प म्हणाले की संवाद सुरूच आहे, पण पद्धत बदलली आहे. प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेटीसाठी लांब प्रवास करण्याऐवजी आता बहुतांश चर्चा फोनवरून होत आहेत, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष भेटीतील चर्चा अधिक प्रभावी असल्याचे त्यांनी मान्य केले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व मतदानाचा कल दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातही ...
होर्मुज जलडमरूमध्ये सध्या अमेरिका-इराण तणावाचे मुख्य केंद्र बनले आहे. हा जगातील सर्वाधिक व्यस्त तेलमार्गांपैकी एक असून सामान्य परिस्थितीत दररोज 100 हून अधिक जहाजे ये-जा करत असत. मात्र सध्याच्या संकटामुळे येथील वाहतूक लक्षणीयरीत्या घटली आहे.





