नितेश राणे यांचा संजय राऊतांना इशारा
जिहाद्यांना ठेचून काढण्याचं आमचं नियोजन : नितेश राणे
मुंबई : ‘आज सकाळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जे मार्गदर्शन केलं, त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षांत आपला देश आर्थिक समृद्धीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत म्हणाला की, आमच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावलेलं आहे. अल्पमताचं त्यांचं सरकार आहे. असं बोलणाऱ्या या नालायकाच्या मालकाचं मविआचं सरकार बहुमताचं होतं का? तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या लावल्या होत्या’, अशी जळजळीत टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत एनडीए सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
पुढे ते म्हणाले, आजपर्यंत उद्धव ठाकरेने स्वतःच्या हिंमतीवर सरकार बनवलं नाही, १०० पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीवर आणू शकला नाही आणि हा आमच्या सरकारला नावं ठेवतो. तुझा मालक हल्लीच दिल्लीला गेला होता आणि अक्षरशः काँग्रेसवाल्यांचे पाय धरुन आला की मला कसंही करुन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करा, असा लाचार मालक असताना तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नावं ठेवायची हिंमत करु नको, असा इशारा नितेश राणे यांनी राऊतांना दिला.
‘महायुती सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला असंख्य माताभगिनींच्या खात्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पहिला हप्ता जमा झाला. माझ्या मतदारसंघात जवळपास ४० टक्के महिलांना हा लाभ मिळाला. यासाठी राज्य सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी सिंधुदुर्गवासियांकडून मनापासून आभार मानतो. काल मला काही माताभगिनींचे फोनही आले आणि त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘दिलेला शब्द पाळणारे, वचनपूर्ती करणारे खऱ्या अर्थाने आमचे हक्काचे भाऊ सरकार चालवत आहेत. म्हणून आम्हाला सुरक्षित वाटतंय’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या, असं नितेश राणे यांनी सांगितलं.
जिहाद्यांना ठेचून काढण्याचं आमचं नियोज\न
जिहादी विचारांची जी काही लोकं आज आपल्या राज्यामध्ये वळवळतायत, ज्यांना टिपू सुलतान किंवा औरंग्या आपला बाप वाटतो, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कोणीच आपला बाप म्हणून स्विकारत नाही. म्हणून जे काही मोजके जिहादी मुंब्रामध्ये राहिले त्यांना योग्य वेळी ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही योजलेला नाही. त्यांना लवकरच टिपूच्या कबरेच्या बाजूला झोपवण्याचं सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.