Saturday, November 1, 2025
Happy Diwali

माझे सोबती : कविता आणि काव्यकोडी

माझे सोबती : कविता आणि काव्यकोडी
घरीदारी मला भेटती नवे जुने माझे सोबती घरात आई, बाबा, ताई लाड माझे पुरवीत राही शेजारीपण किती चांगले गप्पाटप्पा खेळ रंगले शाळेत मोठ्ठं मित्रमंडळ थोडं खट्याळ खूप प्रेमळ गुरुजी, बाई, शिपाई काका प्रेमाने मला मारतात हाका अंगणात आहे फुलांची बाग वाटेत आहे झाडांची रांग पाखरांचा थवा रोज भेटतो जीवाभावाचे हितगुज साधतो गाय, वासरू, मांजर, मोती तेही आहेत माझे सोबती साऱ्यांमुळे आपला परिसर हसे सुंदर साजिरा गोजिरा दिसे

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) खेळ खेळता येतो हिशेब ठेवता येतो माहितीचा खजिना उघडून नवा देतो पदोपदी माणसाच्या उपयोगी पडतो कोण हा मित्र जगाशी जोडतो? २) पोस्टमनची वाट पाहायला नको तिकीट, पाकीट तर नकोच नको पाठवल्यावर खात्रीने भेटतो हा मित्र नव्या काळातलं हे कोणतं पत्र? ३) चुन्यासोबत आल्यावर कुंकू तयार होते अंगाला चोळल्यास उजळपणा देते रोजच्या जेवणात घरगुती उपचारात कोणती ही वनस्पती हमखास वापरतात?

उत्तर -

१) संगणक  २) ईमेल ३) हळद
Comments
Add Comment