Central railway megablock : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक!

  125

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत घेतला जाईल. तसेच, हार्बर मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव,कुर्ला,घाटकोपर,विक्रोळी,भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.


ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड,भांडुप,विक्रोळी,घाटकोपर,कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या व पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील



हार्बर मार्ग


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी व वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे व गोरेगाव येथे जाणाऱ्या व सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल व बेलापूर व वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव व वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले