Paris Olympic 2024: भारताला मिळाले सहावे पदक, अमन सहरावतने कुस्तीमध्ये जिंकले कांस्यपदक

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहावे पदक मिळवले आहे. अमन सहरावतने पुरूषांच्या ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने प्युर्टो रिकोच्या डारियन क्रूझला १३-५ असे हरवले. हे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधील हे सहावे पदक आहे. भारताने आतापर्यंत या ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि ५ कांस्यपदक जिंकले आहेत.


अमन सहरावत या कुस्तीमध्ये सुरूवातीपासूनच वरचढ ठरला होता. प्रतिस्पर्धी कुस्तीपटूने एकवेळ ३-२ अशी आघाडी घेत रंगत आणली मात्र त्यानंतर अमनने जबरदस्त कमबॅक करत कुस्ती जिंकली.



१६ वर्षांची परंपरा राखली कायम


भारत २००८ बीजिंग ऑलिम्पिकपासून कुस्तीमध्ये नेहमीच ऑलिम्पिक पदक जिंकत आलेला आहे. २००८मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला होता. सुशीलने त्यानंतर २०१२मध्ये आपल्या पदकाचा रंग बदलत रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदकाची कमाई केली होती. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत तिरंगा फडकावला होता. तर २०२०मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनियाने तर आता अमन सेहरावतने ही परंपरा कायम राखली.

२००८ बीजिंग ऑलिम्पिक - सुशील कुमार(कांस्य पदक)

२०१३ लंडन ऑलिम्पिक - सुशील कुमार(रौप्य पदक), योगेश्वर दत्त(कांस्य)

२०१६ रिओ ऑलिम्पिक - साक्षी मलिक(कांस्यपदक)

२०२० टोकियो ऑलिम्पिक - रवी दहिया(रौप्य पदक), बजरंग पुनिया(कांस्य)

२०२४ पॅरिस ऑलिम्पिक - अमन सहरावत(कांस्यपदक)
Comments
Add Comment

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या