Manu Bhaker : मनू भाकर भारतात दाखल; चाहत्यांकडून जंगी स्वागत!

देशवासीयांना दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हणाली की...


नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कौतुकास्पद कामगिरी करणारी मनू भाकर (Manu Bhaker) आज भारतात दाखल झाली आहे. एकाच खेळात दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला मनू भाकर ही आज सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. एअरपोर्टवर येताच तिचे चाहत्यांकडून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या खेळात मनू भाकेर सुवर्णपदकाची दावेदार होती. मात्र काही गुणांमुळे तिने कांस्य पदक पटकावले. मात्र तिच्या या कामगिरीचे संपूर्ण जगभरात प्रचंड कौतुक होत आहे. आज भारतात परतताच चाहत्यांनी मनी भाकरचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. तसेच मनू भारतात आल्यानंतर तिने देशवासीयांना खास शब्दांमध्ये प्रतिक्रिया देखील दिली.



काय म्हणाली मनू भाकर?


“भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अ‍ॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदके भारताला मिळाली पाहिजेत, असेही मत मनू भाकरने यावेळी व्यक्त केले. तसेच मला नेमबाजीच्या एकेरी व दुहेरी प्रकारात कांस्य पदक मिळाले. परंतु अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नसल्याचे वाईट वाटत आहे. पण दोन पदक जिंकल्याचा खूप आनंद झाला'', असे मनू भाकरने यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर