Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPooja Khedkar : पूजा खेडकर आहे तरी कुठे?

Pooja Khedkar : पूजा खेडकर आहे तरी कुठे?

  • फरार पूजा खेडकरचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश; परदेशात गेली असल्याची चर्चा
  • दिवसेंविरोधातील चौकशीलाही गैरहजर, दिवसे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार?
  • पूजा खेडकरची ‘यूपीएससी’ विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

पुणे : यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे. पूजा खेडकरचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूजा खेडकरवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. फरार पूजा खेडकरचा शोध घेण्यात पोलिसांना येत असलेल्या अपयशाबाबतही जनसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

पूजा खेडकरने (Pooja Khedkar) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. पूजा खेडकरने दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते.

वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची (Pooja Khedkar) तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती. त्यावेळी खेडकरने पोलिसांकडे काही अवधी मागितला होता. यानंतर आठवडाभरानंतरही पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाली नाही. त्यामुळे जबाब नोंदविण्यास उपस्थित रहावे, असे समन्स पोलिसांनी तिला पुन्हा बजावले होते. तीनदा समन्स बजावूनही ती हजर झाली नाही.

जिल्हाधिकारी दिवसे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार?

राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा खेडकरवर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पुजा खेडकरनी पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे.

पूजा खेडकर ‘यूपीएससी’ विरोधात दिल्ली हायकोर्टात

दरम्यान, वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस पद यूपीएससीने रद्द केल्यानंतर यूपीएससीने आयएएस उमेदवारी रद्द केल्याच्या विरोधात पूजा खेडकर हिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूजा खेडकर हिला नोटीस बजावणाऱ्यांना तिने पक्षकार केले आहे. या याचिकेत पूजा खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, मुसरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी, पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे.

पूजा खेडकर हिला उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सतत खोटे बोलून आणि प्रमाणपत्रांमध्ये फसवणूक करुन तिने यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. याप्रकरणात तिच्याविरोधात पुरावेही आढळून आल्याने आता दिल्ली पोलीस अटक करण्यासाठी तिचा शोध घेत आहेत. पण, ती अद्याप फरार आहे.

पूजा खेडकरने यूपीएससीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. त्यानंतर यूपीएससीने तिची निवड रद्द केली आहे. इतकंच नाही तर भविष्यात त्यांना कोणत्याही यूपीएससी परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकरच नाही तर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती. त्या जामिनावर बाहेर आहेत.

पूजा खेडकरचा शोध सुरू

यूपीएससीने उच्च न्यायालयात सांगितले की, पूजा खेडकर यांनी केवळ त्यांचे नावच नाही तर तिच्या पालकांचे नाव देखील बदलले आहे. याशिवाय, फोटो-स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण केली. पूजा खेडकर हिने तब्बल सातवेळा आपले नाव बदलल्याचे यूपीएससीने न्यायालयात सांगितले. तसेच, तिने नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्तवेळा परीक्षा देत प्रयत्न करून फसवणूक केल्याचा आरोपही तिच्यावर आहे. दिल्ली पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच, ते पूजा खेडकरचा शोधही घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -