Monday, June 8, 2026

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'बाबा ट्रॅव्हल्स'ची खासगी लक्झरी बस (Bus) पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, पिंपरी माळी गावाच्या शिवारात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोर धावणाऱ्या ट्रकला (Truck) पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडकेनंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिक, पोलीस (Police) आणि महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवळपास दीड तासांच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातामागे चालकाची डुलकी, अतिवेग किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >