दिल्लीतील कोचिंग सेंटर्स बनली डेथ चेंबर्स; केंद्रासह दिल्ली सरकारला बजावली ‘सुप्रिम’ने नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात पुरामुळे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या तिघांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दिल्लीतील कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर्स बनली आहेत, असे निरीक्षणही यावेळी खंडपीठाने नोंदवले.


खंडपीठाने नमूद केले की, दिल्लीतील कोचिंग सेंटर्स हे सुरक्षिततेच्या नियमांचे आणि जीवनासाठी मूलभूत मानकांचे पूर्णपणे पालन करत नाहीत तोपर्यंत ते ऑनलाइन काम करू शकतात. या संस्था देशाच्या विविध भागांतून आलेल्या इच्छुकांचा जीव धोक्यात घालत आहेत.


या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेला सध्या अस्तित्वात असलेल्या सुरक्षेच्या नियमांचे तपशीलवार उत्तरे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. खंडपीठाने कोचिंग सेंटर्समधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात पुराचे पाणी घुसल्याने उत्तर प्रदेशातील श्रेया यादव (२५), बिहारमधील तान्या सोनी (२५) आणि केरळमधील नेविन डेल्विन (२४) यांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, विविध कोचिंग संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वाढीव सुरक्षा उपायांची मागणी करत निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, तीस हजारी न्यायालयाने जुन्या राजेंद्र नगर येथील तळघराच्या सहमालकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात