MP Wall Collapse : धक्कादायक! मातीचे शिवलिंग बनवताना भिंत कोसळल्याने ९ चिमुकल्यांचा मृत्यू

भोपाळ : सध्या केरळच्या वायनाडमधील भूस्खलनामुळे (Wayanad Landslide) देशभारतून हळहळ व्यक्त होत असतानाच मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये आज सकाळी मातीची भिंत कोसळल्याची (MP Wall Collapse) दुर्घटना घडली. यामध्ये ९ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भगवत कथेचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच याठिकाणी शिवलिंगांची निर्मिती केली जात आहे. रविवारीही शिवलिंग बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तसेच आज रविवारची शाळेला सुट्टी असल्यामुळे मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलेही मोठ्या संख्येने आली होती.


परंतु शिवलिंग बनवत असताना सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मंदिर परिसराला लागून असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत थेट चिमुकल्यांच्या अंगावर कोसळली. यामुळे येथील ९ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन तातडीने बचावकार्यास सुरुवात केली.



मुख्यमंत्र्यांकडून ४ लाख रुपयांची मदत जाहीर


मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांसाठी ४ लाखांची मदत जाहीर केली. जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मोहन यादव म्हणाले, 'सागर जिल्ह्यातील शाहपूर या गावात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून माझे मन हेलावून गेले. मी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्यास सांगितले आहे'.


त्याचबरोबर मृत मुलांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जखमी मुलांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, आणि ज्यांनी आपली मुलं गमावली त्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना देखील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा

गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली

पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले