Nitesh Rane : मी सर्वधर्मसमभाव मानत नाही; आमच्या हिंदूराष्ट्रात पहिलं हित हिंदूंचंच!

करमाळ्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांचं वक्तव्य


'सरकार हिंदुत्ववाल्यांचं आहे, तुम्हाला जिहाद्यांना उत्तरं द्यायची नाहीत'असं म्हणत अधिकाऱ्यांनाही दिली तंबी


सोलापूर : धारावीतील अरविंद वैश्य आणि उरणमधील यशश्री शिंदे या दोघांची जिहाद्यांकडून करण्यात आलेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ तसेच करमाळ्यातील सरकारी जमिनीवर विकृत विधर्मींकडून वक्फच्या नावावर अवैधरित्या गाळे काढून भाडे गोळा करणे सुरु आहे, या विरोधात आवाज उठवून अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रमुख वक्ता म्हणून भाषण केले. यावेळी 'आम्ही तुमच्याशी बोलायला आलो आहे. जी काही मस्ती या ठिकाणी सुरु आहे ती मस्ती बंद झाली पाहिजे हे शेवटचं सांगायला आणि धमकीसुद्धा द्यायला आलो आहे', असं नितेश राणे म्हणाले.


नितेश राणे म्हणाले, या ठिकाणी येण्यापूर्वी काही पोलीस बांधवांचे मला फोन आले की सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही येऊ नका. चुकून कोणी दगड वगैरे मारला तर परिस्थिती चिघळेल. पण मी म्हणतो की भाईचारा असो वा सर्वधर्मसमभाव, या सगळ्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतला नाही आहे. हे जिहादी आपसात भाई भाई असतात आणि अन्य वेळी आमच्या बुडाखाली चारा टाकतात, अशी परिस्थिती आहे. कुणी दगड भिरकावला तर आम्ही गप्प बसणाऱ्यातले आणि पळून जाणाऱ्यातले नाही. ज्या दिशेने दगड मारला त्या मोहल्ल्यातील प्रत्येक घरात जाऊन अशा ठिकाणी दगड मारु की परत ढुंगणं वर केली जाणार नाहीत, असा नितेश राणे यांनी इशारा दिला.


नितेश राणे म्हणाले, मी या देशामध्ये सर्वधर्मसमभाव मानत नाही. हे हिंदूराष्ट्र आहे, त्यामुळे इथे हिंदूंचं हित पहिलं बघितलं जाणार आणि मग बाकीच्यांना मोजलं जाणार. यांच्या जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा ऐकायला मिळतं का सर्वधर्मसमभाव? तेव्हा उभं राहायला तरी जागा मिळते का? तेव्हा डीजे १० वाजता बंद होतात का? तेव्हा आमच्या पोलीस बांधवांच्या त्यांना डीजे बंद करा सांगण्याची हिंमत होते का? त्यामुळे आधी त्यांना जाऊन बोला आणि मग आमच्यासमोर येऊन सिंघमगिरी करा, असं नितेश राणे यांनी धमकावलं.



वक्फ बोर्डाच्या बाबतीत नितेश राणे म्हणाले, त्यांच्या मशिदीचा अर्धा इंच कोणी घेऊन दाखवा आणि घरी सुखरुप जाऊन दाखवा. पण ते आमच्या जमिनीही घेतायत, त्याच्यावर हिरवी चादरही चढवतायत, दर्गेही बांधतायत आणि आम्ही काहीच करु शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण मानतो तर मग तहसील कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांचं धर्मांतर झालं आहे का की ते त्यांची दाढी कुरवाळायला जातात? हे असं चालणार नाही. सरकार हिंदुत्ववाल्यांचं आहे, तुम्हाला जिहाद्यांना उत्तरं द्यायची नाहीत, असं नितेश राणे यांनी खडसावलं.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा