Railway Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, प्रशासनाचे आवाहन


मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या रेल्वेबाबत (Mumbai Railway) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्या वतीने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी प्रवाशांनी लोकलचा प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



असे असेल वेळापत्रक


मध्य रेल्वे (Central Mega Block)


  • कुठे - माटुंगा ते मुलुंड अप - डाऊन धीम्या मार्गावर

  • कधी - सकाळी ११ वाजून ०५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत

  • परिणाम - या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.


हार्बर रेल्वे (Harbour Mega Block)


  • कुठे - वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर

  • कधी - सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत

  • परिणाम - ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल याकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल / बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.


पश्चिम रेल्वे (Western Mega Block)


  • कुठे - वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन धीम्या मार्गावर

  • कधी - शनिवारी - रविवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटं ते पहाटे ४ वाजेपर्यंत

  • परिणाम - या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विरार/वसई रोड ते बोरिवली / गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर