Kalyan news : कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती! होर्डिंग कोसळल्याने दोघे जखमी

दुर्घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान


कल्याण : मे महिन्यात मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. भलंमोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं व १७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर ७० हून अधिक लोक जखमी झाले. याच घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी होता होता टळली आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे.


सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्याच्या एका बाजूला अनेक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे.


होर्डिंगखाली ४ ते ५ गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या