Pooja Khedkar : पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी!

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने रद्द केल्याचे समजते. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये (UPSC exam) पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असेही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


यूपीएससीने पूजा मनोरमा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) यांना दिलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला. तसेच पूजा खेडकर यांच्या पालकांचा घटस्फोट झालाय की नाही? याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.


पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांना क्रीमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पालकांचा घटस्फोट झाला असून आपण आईकडे राहतो, त्यामुळे आपले उत्पन्न कमी आहे, असा पूजा खेडकर यांचा दावा समोर आला. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


दरम्यान, गुरुवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर यूपीएससीने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Comments
Add Comment

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की