Wayanad landslide : केरळच्या वायनाडमध्ये पावसाचे थैमान! भूस्खलनामुळे १९ जणांचा मृत्यू

शेकडो लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरु


वायनाड : केरळच्या (Kerala) मेप्पाडी भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बचावकार्य मदतीचे काम सुरू असताना आज पहाटे पुन्हा केरळमध्ये भूस्खलन (Wayanad landslide) झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र सलग दोनवेळा भूस्खलन झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.१० वाजेच्या सुमारास वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची घटना घडली. या भूस्खलनात दोन चिमुकल्यांसह १९ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु सध्या केरळमध्ये पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या दुर्घटनेनंतर १६ जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या असून केरळ सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २