Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

दररोज मिळणार ४ जीबी डेटा, या कंपनीने काढला जबरदस्त प्लान

दररोज मिळणार ४ जीबी डेटा, या कंपनीने काढला जबरदस्त प्लान

मुंबई: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या पोर्टफोलिओला अपडेट केले आहे. यासोबतच कंपन्यांनी नवे प्लान्सही लाँच करण्यास सुरूवात केली आहे. याच क्रमामध्ये वोडाफोनआयडियाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगला प्लान आणला आहे. हा प्लान इतर दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरकडे नाही.


आम्ही बोलत आहोत व्हीआयच्या दररोज ४ जीबी डेटाच्या प्लानबद्दल. आतापर्यंत अधिकाधिक ३ जीबी डेटा देणारे प्लान्स मिळत होते. कंपनीने ५३९ रूपयांचा प्लान बाजारात आणला आहे. यात दररोजच्या डेली डेटासोबत vi Hero Unlimited फायदे मिळत आहेत.


या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. याशिवाय २८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत डेटा आणि एसएमएसही मिळतात. रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएस आणि vi Hero Unlimitedचे बंडल मिळते.


यात युजर्सला बिंग ऑल नाईट अंतर्गत १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळतो. सोबतच डेटा रोलओव्हरचीही सुविधा मिळते. ग्राहक आपला उरलेला डेटा दुसऱ्या आठवड्यातही वापरू शकतात. यात २ जीबी अतिरिक्त डेटा डिलाईट ऑफरअंतर्गत फ्री मिळतो.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना अधिक डेटाची गरज असते. यात संपूर्ण व्हॅलिडिटीमध्ये ११४ जीबी डेटा मिळेल.

Comments
Add Comment