Laxman Hake : शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शरद पवार मूग गिळून गप्प


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाने (Maratha VS OBC) केलेल्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसह एकत्र बैठक बोलावली होती. मात्र, विरोधक या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या सगळ्यामागे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. या चर्चेनंतर मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार साहेब ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, अशी टीका आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.


बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाके म्हणाले, "मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लागलेली असताना शरद पवार शांत बसत आहेत. त्यांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या तोंडी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचे नाव असते. जरांगे ज्यावेळी आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ आहे असं म्हणतात. त्याचवेळी शरद पवार संधी साधतात".


पुढे हाके म्हणाले, "बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात जावून, धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं सांगतात. पण एसटीच्या आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नाही. त्यांनी एकदाची आपली भूमिका स्पष्ट करावी, आमच्यामध्ये भांडण लावू नये", असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही शरद पवार का बोलत नाहीत? ते का मूग गिळून गप्प आहेत? मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जाऊन शरद पवार फक्त पोहे खाऊन आले का ? गावगाडा विस्कळीत होत असताना बोलत नाहीत, हे न कळलेलं कोडं आहे, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.



काय आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद?


राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ताबडतोब सगेसोयरेबाबत अधिसूनचा काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अन्यथा मोठं आंदोलन करू, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं असून तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना