मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यासाठी भारतीय अॅथलीट्सचे दल रेकॉर्ड तोड कामगिरी करत मेडल जिंकण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र यातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही सांगितले की त्यांनाही भारतीय खेळाडूंकडून मेडलची आशा आहे.
याच काणामुळे बीसीसीआयने ऑलिम्पिक अभियान पाहता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला ८.५ कोटींची मदत केली आहे. याची घोषणा खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मला ही घोषणा करताना गर्व होत आहे की बीसीसीआय पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या खेळाडूंना सपोर्ट करत आहे. आम्ही या अभियानासाठी आयओएला ८.५ कोटी रूपये देत आहोत.
भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी जूनमध्ये टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकला होता. तेव्हा बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघ आणि सपोर्टिंग स्टाफला बक्षीस म्हणून १२५ कोटी रूपये दिले होते. १५ खेळाडू आणि माजी हेड कोच राहुल द्रविड ५-५ कोटी रूपये दिले होते. दरम्यान, द्रविडने केवळ २.५ कोटी रूपये घेतले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार ११७ खेळाडू
यावेळेस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू भाग घेत आहेत. क्रीडा मंत्रालयाने याशिवाय सहयोगी स्टाफच्या १४० सदस्यांनाही मंजुरी दिली आहे. यात क्रीडा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सहकारी स्टाफच्या ७२ सदस्यांच्या सरकारच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकची सुरूवात २६ जुलैला होत आहे ही स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.